“प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत असल्याने…”; पंतप्रधान मोदींचे क्रिएटर्सना आवाहन

WAVES 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) परिषदेचे आज 1 मे 2025 रोजी उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित शिखर परिषदेला ९० देशांचे ११ हजार प्रतिनिधी ऑनलाइन-ऑफलाइन सहभागी होते. या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी तरुण क्रिएटर्सना खास आवाहन केले आहे.
दरम्यान, वेव्हज २०२५ हा चार दिवसीय कार्यक्रम मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला एकत्र आणत आहे. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’, अशी वेव्हज 2025 ची टॅगलाइन आहे. यामध्ये 90 हून अधिक देशांचा सहभाग आहे. WAVES बाजार हे कंटेंट क्रिएटर्स, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी जागतिक ई-मार्केटप्लेस असेल, जिथे सह-निर्मिती आणि IP खरेदी सुलभ होईल.
मनुष्याला रोबॉट नाही बनवायचं तर…
“प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तंत्रज्ञानाची भूमिका वाढत असतानाच मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. क्रिएटिव्हिटीच्या जगातील दिग्गजांसमोर मी आणखी एक विषय मांडतो. तो विषय आहे, क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटीचा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत आहे. अशावेळी मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्टची गरज आहे. ते क्रिएटिव्ह वर्ल्डच करेल. आपल्याला मनुष्याला रोबॉट नाही बनवायचं, तर आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे,” असं यावेळी मोदी म्हणाले. WAVES 2025 |
पुढे त्यांनी सांगितले की, “आज आपल्या तरुण विचाराला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे. वेव्हज हे काम करू शकतं. या जबाबदारीपासून मागे हटलो तर युवा पिढीसाठी ते घातक ठरेल. ग्लोबल कोऑर्डिनेशनही आता तेवढंच महत्त्वाचं आहे. हा मंच आपल्या क्रिएटर्सना ग्लोबल स्टोरी टेलर्सशी कनेक्ट करेल. आपल्या एनिमेटर्सना ग्लोबल व्हिजनरीशी जोडेल आणि ग्लोबल चॅम्पियन बनवेल. तुम्ही भारताला तुमचं कंटेंट प्लेग्राआऊंड बनवा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. WAVES 2025 |
हेही वाचा:





