अल्लू अर्जुनचा चाहत्याला सेल्फीसाठी नकार; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Allu Arjun | ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्याचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सुपरहिट ठरला आहे. यानंतर अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग देखील वाढला आहे. सध्या त्याचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतो. मात्र अल्लू अर्जुन सफॅनला सेल्फी द्यायला नकार देतो.
अल्लू अर्जुन ‘वेव्हज 2025’साठी मुंबईत आला होता. तेव्हा तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. व्हायरल व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन विमानतळावर दिसताच एक चाहता त्याच्याकडे सेल्फी काढण्यासाठी येतो. मात्र अल्लू अर्जुन त्याची पाठ थोपटून सेल्फीसाठी नकार देतो. यानंतर अल्लू अर्जुनचा बॉडीगार्ड त्याला बाजूला करतो. यावरून सोशल मीडियावर अल्लू अर्जुनला ट्रोल केले जात आहे. Allu Arjun |
#AlluArjun refused a pic to fan as he departed from Mumbai airport pic.twitter.com/6vwhk6NTQ9
— $@M (@SAMTHEBESTEST_) May 2, 2025
एकाने कमेंट करत लिहिले की, “या चाहत्यांमुळेच तुमचे चित्रपट १००० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात,’ दुसऱ्याने लिहिले, ‘अल्लू अर्जुन कधीही चाहत्यांबरोबर सेल्फीसाठी पोझ देत नाही.’ तर काही चाहत्यांनी ‘कधीकधी सेलिब्रिटींचे वेळापत्रक खूपच व्यस्त असते, ते देखील माणूसच आहे,’ असे म्हणत त्याचे समर्थन केले.
पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन अॅटलीसोबत ‘AA22xA6’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अॅटलीने शाहरुखसोबत ‘जवान’ सारखा हिट चित्रपट दिला आहे, त्याने साउथमध्ये ‘थेरी’ सुपरहिट चित्रपट केला आहे. आता अल्लू अर्जुन आणि अॅटली एकत्र काम करणार आहेत. याशिवाय अल्लू अर्जुन ‘पुष्पा ३’ मध्ये देखील दिसणार आहे. Allu Arjun |
हेही वाचा:
पुणे जिल्हा : चालकाचे नियंत्रण सुटले अन् पुणे-नगर रस्त्यावर फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…





