‘क्या ब्बात है …’, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एन्ट्री घेताच संकर्षण कऱ्हाडेचा लज्जतदार पदार्थांवर ताव

Sankarshan Karhade | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहीला आहे. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. टीव्ही मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये विविध भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय तो त्याच्या अनोख्या शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहे.
अभिनेता सध्या रंगभूमीवर सक्रियपणे काम करतोय. त्याचा आणि स्पृहा जोशीचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या प्रयोगांमध्येच संकर्षणने राजकीय तसेच सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या नवनवीन कविता सादर केल्या आहेत. प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाचं वेळोवेळी कौतुक झालं आहे. नुकतंच त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम कराड येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संकर्षणने पश्चिम महाराष्ट्रातील पदार्थांवर ताव मारला. Sankarshan Karhade |
View this post on Instagram
त्याबद्दल त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने जेवणाच्या ताटासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “क्या बात है… पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही… डोकंच काम करणं बंद होतंय बघा…! असला वाद खुळा जेवलोय कराडमध्ये… ज्वारीची अन् बाजरीची भाकरी, भरलं वांगं, अख्खा मसूर, शेवभाजी… सगळ्यात शेटवी मऊ मऊ इंद्रायणी भात… हे सगळं तुमच्याशी शेअर केलं केल्यावर जास्त पोट भरतंय बघा… बाकी बरंय नव्हं…???आणि हो, या गाण्याचा आन् फोटूचा काहीच संबंध नाहीये… पण जेवताना हेच गाणं लावलं हूतं तिथल्या पोरानं…”. Sankarshan Karhade |
संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे . यासोबतच संकर्षणने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट करत छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या ‘संकर्षण कऱ्हाडे नाट्य महोत्सवा’बद्दल माहिती दिली आहे. येत्या १५ ते १७ जानेवारी रोजी हा महोत्सव पार पडणार आहे. Sankarshan Karhade |
हेही वाचा :





