Beed News : बीड जिल्ह्यात तब्बल ‘इतके’ शस्त्र परवाने केले रद्द; देशमुख प्रकरणानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर

Santosh Deshmukh Case – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दहशत, सत्ता, पैसा आणि राखेचे भयानक वास्तव समोर आल्यानंतर बीडसह राज्यात मोठी खळबळ उडाली. पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही.
सर्रास दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांमुळे मोठी ओरड सुरू असताना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाला आहे. बीड जिल्ह्यात महिन्याभरात 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये 8 जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत.
बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले असून यावर कारवाई करत आत्तापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आले आहेत. 127 शस्त्र रद्द होणार असल्याचा सांगण्यात आले. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे .
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. घाऊकपणे दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवानांच्या तपासणीसाठी आता पावलं उचलली जात असून आत्तापर्यंत 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यात मृत असताना हे शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांची संख्या 118 एवढी आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का? जिवंत आहे का ? याची खात्री करत आहेत.
यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे .मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते. त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत.





