Shirur News : एका उसाला तब्बल 60 कांडे; 50 गुंठ्यात घेतले 146 टन उत्पादन

शिरूर : योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर आणि एकात्मिक शेती पद्धतीने जयकुमार ज्ञानेश्वर मोटे रा. सविंदणे ता. शिरूर यांनी शेतीकडे विशेष लक्ष देऊन ५० गुंठे मध्ये तब्बल १४६ टन उत्पादन घेतले आहे. ऊसाला सुमारे ६० च्या जवळपास कांडे लागले आहेत. मोटे यांनी आपल्या ५० गुंठे क्षेत्रात जून २०२३ मध्ये २६५ या वाणाच्या आडसाली ऊसाच्या कांड्याची चार फुटी सरी पद्धतीने लागवड केली.
मोटे यांच्या क्षेत्रातील ऊसाची नुकतीच तोडणी झाली आहे. ५० गुंठे क्षेत्रातील १४६ टन ऊस येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यात घातला आहे. एका ऊसाचे वजन जवळपास ६ ते ७ किलो आहे. लागवडी पूर्वी एकरी चार ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर सरी फोडताना रासायनिक व वेस्टीज कंपनीची सेंद्रीय खते यांचा भेसळ डोस दिला. गणेश भापकर यांच्याकडून दोन फवारणी ड्रोनद्वारे केल्या.
विहिरीवरून पाण्याची व्यवस्था केली. पाण्यातून भारतीय वेस्टीज कंपनीचे शेंद्रीय खते दिली. शेवटचे २ महिने पाणी नव्हतं तरी पण वेस्टिज ऍग्री प्रोडक्ट असल्यामुळे ऊसाची चांगली वाढ झाली. एकरी रासायनिक व सेंद्रीय खते जवळपास खर्च २३ ते २५ हजार झाला. वेस्टिज कंपनीचे अनिल पाटील सर, ओंकार जाधव सर, सुरज वाघ सर यांनी मार्गदर्शन केले असे जयकुमार मोटे यांनी सांगितले.





