बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीच्या चेअरमनपदी ऍड. बाळासाहेब खोपडे
Updated On:

पुणे – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या शिस्तपालन समितीच्या चेअरमनपदी ऍड. बाळासाहेब खोपडे यांची निवड झाली आहे. याबाबतने नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.
बार कौन्सिलचे सदस्य असलेले ऍड. विठ्ठल कोंडे देशमुख आणि ऍड. राजेंद्र उपाम या समितीचे सदस्य आहेत. ऍड. खोपडे हे माजी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारी वकील संघटनेचे महासचिव म्हणून यापूर्वी काम केले आहे.
पुणे जिल्हा कॉंग्रेस, लीगल सेलचे ते अध्यक्ष आहेत. व्हिक्टीम प्रोटेक्शन शेल्टर अँड एम्पॉवरमेट ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत.





