अजित पवारांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा मिळताच सुषमा अंधारेंची खोचक टीका; म्हणाल्या “लोकशाहीच्या बळटीकरणासाठी…”

Sushma Andhare On Ajit Pawar | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केले असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधीनंतर लगेच अजित पवार यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून आता विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करत अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत, “सन्माननीय अजित दादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार,” असे लिहिले आहे. Sushma Andhare On Ajit Pawar |
सन्माननीय अजित दादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm https://t.co/GsJbztL1Nq pic.twitter.com/UdRvYf0mXS
— SushmaTai Andhare (@andharesushama) December 6, 2024
सुषमा अंधारे यांनी व्हिडीओत म्हटले की “आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता सहीसलामत दादांना परत केली. लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनी सुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता.”
पुढे त्या म्हणाल्या, “अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज लगेचच अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. हा लोकशाही बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा लढवला गेला आहे. Sushma Andhare On Ajit Pawar |
भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिंमतीने हा लढा दिला होता. या शूरवीरांनी मोठ्या ताकदीने हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार,” असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. Sushma Andhare On Ajit Pawar |
काय आहे नेमकं प्रकरण?
आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र, याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आहे. तसेच, अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.
हेही वाचा:
अपघातानंतर टेम्पोत अडकेल्या दोघांची सुटका; चाकण एमआयडीसी अग्निशामक दलाची कामगिरी





