Aryna Sabalenka : आर्यना सबालेन्काचा मियामी ओपनवर कब्जा! ‘सनशाईन डबल’ साधत रचला इतिहास, इगा स्वियाटेकचा मोडला विक्रम
Aryna Sabalenka : टेनिस जगतातील सध्याची सर्वात शक्तीशाली खेळाडू आर्यना सबालेंका हिने मियामी ओपनचे जेतेपद पटकावून इतिहास रचला आहे.

Aryna Sabalenka Miami Open Winner 2026 : बेलारूसची स्टार टेनिसपटू आर्यना सबालेन्काने सलग दुसऱ्यांदा मियामी ओपनचे जेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. तिने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या कोको गॉफचा ६-२, ४-६, ६-३ असा पराभव केला. या विजयासह एकाच हंगामात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन जिंकून ‘सनशाईन डबल’ पूर्ण करणारी ती जगातील पाचवी महिला खेळाडू ठरली आहे.
दिग्गजांच्या यादीत पटकावलं स्थान –
सलग दोनदा मियामी ओपन जिंकण्याचा पराक्रम यापूर्वी केवळ ऐश बार्टी आणि सेरेना विल्यम्स यांनाच जमला होता. सबालेन्काने आता या दिग्गजांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. तसेच, २००० सालापासून वर्षातील पहिल्या चारही हार्ड कोर्ट टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचणारी ती चौथी खेळाडू ठरली आहे. या चारपैकी ब्रिस्बेन आणि सनशाईन डबलसह तिने तीन जेतेपदे खिशात घातली आहेत.
नंबर १ चा नवा रेकॉर्ड –
World number one Aryna Sabalenka beat Coco Gauff 6-2, 4-6, 6-3 to retain her Miami Open title and extend her exceptional start to 2026.
Belarusian Sabalenka, 27, is the fifth female player – and the first since Iga Swiatek in 2022 – to complete the ‘Sunshine Double’ by winning… pic.twitter.com/DH4icOe9yo
— United News of India (@uniindianews) March 29, 2026
या विजयामुळे सबालेन्काचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान अधिक मजबूत झाले आहे. सोमवारपासून ती सलग ७६ व्या आठवड्यात नंबर १ वर राहणार असून, तिने इगा स्वियाटेकचा सलग सर्वाधिक काळ नंबर १ राहण्याचा विक्रम मोडला आहे. सबालेन्काच्या नावावर आता २४ डब्ल्यूटीए एकेरी जेतेपदे आणि एकूण ३० पदके जमा झाली आहेत.
“इतिहासात नाव कोरायचे होते!”
आर्यना सबालेन्काने कोको गॉफला हरवून मियामी ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावले (Aryna Sabalenka)
विजयानंतर भावूक झालेल्या सबालेन्काने म्हटले, “हे जेतेपद माझ्यासाठी अत्यंत खास आहे. टेनिसच्या इतिहासात स्वतःचे नाव अजरामर करणे हेच माझे ध्येय होते आणि आज मी ते साध्य केले आहे. मला या ट्रॉफीचा आणि स्वतःचा खूप अभिमान वाटतो.”





