आर्यन खानचं दिग्दर्शनात पदार्पण; लेकासाठी शाहरुखची चाहत्यांना भावनिक साद

Shah Rukh Khan Request | बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने जगभरात मोठे नाव कमावले आहे. यानंतर आता त्याचा मुलगा आर्यन खान देखील सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मात्र तो अभिनय करताना दिसणार नाही, तर दिग्दर्शन करणार आहे. ‘Bas***ds of Bollywood या सीरिजचं दिग्दर्शन आर्यन खानने केले आहे.
नेटफ्लिक्सने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये अनेक प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सैफ अली खान, रिचा, राजकुमार राव यांच्यासह अनेक कलाकार या कार्यक्रमात पोहोचले होते. लेकाच्या पहिल्याच सीरिजच्या घोषणेसाठी स्वत: शाहरुखने इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी तो भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
या इव्हेंटदरम्यानचा शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुख म्हणाला, “आर्यन आपला पहिला शो दिग्दर्शित करत आहे. तो या प्लॅटफॉर्मवर आहे याचा मला आनंद आहे. त्याने खूप मेहनत घेतली आहे, संपूर्ण टीमने अनेक वर्ष यासाठी प्रयत्न केला आहे. मेहनतीचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होते. कारण आता हे सगळं कुटुंबात आलं आहे तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही तुमचं मनोरंजन करु.”
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला, “हा थोडा फॅमिली शोच झाला कारण नेटफ्लिक्स माझ्यासाठी कुटुंबासारखंच आहे. या शोची निर्माती गौरी आहे तर दिग्दर्शक आर्यन आहे. मी मनापासून विनंती करतो की माझा मुलगा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे, माझी मुलगी अभिनेत्री बनत आहे, माझ्यावर जितकं प्रेम केलं, त्याच्या ५० टक्केही त्यांच्यावर केले तरी खूप आहे.” मात्र आर्यन खानची ही सीरिज नक्की कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Shah Rukh Khan Request |
हेही वाचा:





