काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यन खानची बॉलीवूडची पहिली वेब सिरीज येणार असल्याचे सांगितले होते. या वेबसिरीजमधून शाहरूखचा मुलगा आर्यन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या सिरीजमध्ये इंडस्ट्रीतील तीन मोठे सुपरस्टार म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान एकाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. तिन्ही खान एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यामुळे या सिरीजची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आर्यन खानची ही वेबसिरीज जूनच्या पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीजने मिळून ठरवले आहे की आयपीयलनंतर प्रेक्षकांचे लक्ष्य याकडे वळवायचे आहे. त्यामुळे जूनमध्ये ही नवी सिरीज प्रदर्शित केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. या मालिकेत बॉबी देओल आणि ‘किल’ फेम लक्ष्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सचे कॅमिओ देखील असणार आहे.
अनेक बड्या कलाकारांचेही कॅमिओ असणार
अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सचे कॅमिओही या सिरीजमध्ये असणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग हे स्टार्स आपापल्या भूमिका या सिरीजमध्ये साकारणार आहेत. याशिवाय दोन मोठे दिग्दर्शक करण जोहर आणि एस.एस. राजामौली यांनाही पाहता येणार असल्याची माहिती आहे. तसेच आर्यन खानच्या दिग्दर्शनासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे.
शाहरुख, सलमान आणि आमिर नुकतेच ‘लव्हयापा’च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये एकत्र दिसले होते. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांचा एकत्र दिसले होते. त्यांच्या स्क्रिनिंगमध्ये तिन्ही स्टार्स एकत्र दिसले होते. ‘लव्यपा’ 07 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.