Arvind Kejriwal – ‘आमदार होणे एकवेळ सोपे असेल; पण सरपंचपदाची निवडणूक जिंकणे अवघड आहे. लोकांनी तुमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे तुमच्या गावातील लोकांसाठी काम करा. पंजाबला अंमली पदार्थमुक्त करायचे आहे, असे ते म्हणाले. गावातून व्यसनमुक्तीसाठी कठोर पावले उचला, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. पंजाबमधील लुधियाना येथे 10 हजार नवनियुक्त सरपंचांचा शपथविधी सोहळा सुरू असताना ते बोलत होते. लुधियानाच्या धनांसू गावात असलेल्या सायकल व्हॅलीमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान नवनिर्वाचित सरपंचांना शपथ दिली गेली. या कार्यक्रमाला आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही हजेरी लावली होती. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पक्षाचे इतर नेते कार्यक्रमाला पोहोचले होते. केजरीवाल म्हणाले, सरपंच झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावासाठी आणि लोकांसाठी काम करायचे आहे. कारण तुम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे. देवाला तुमच्याद्वारे तुमच्या गावाचे भले व्हावे असे वाटते. ‘गाव नशामुक्त व्हायला हवं…’ – भगवंत मान त्याचवेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्याला गावे नशामुक्त करायची आहेत. कारण अमली पदार्थ कोण विकतो आणि कोण खरेदी करतो हे गावातील लोकांना माहीत आहे. अनेक गावांमध्ये तरुणांनी क्लब स्थापन केले आहेत, जे अंमली पदार्थांच्या विरोधात काम करत आहेत. याशिवाय सर्व गावे ही हिरवीगार करायची आहेत. एका अहवालानुसार, असे आढळून आले आहे की पंजाबची पाण्याची पातळी आता वाढू लागली आहे. हे एक चांगले लक्षण आहे. खेड्यापाड्यात एकता कायम ठेवली पाहिजे. ४५ हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या. वीज मोफत करण्यात आली आहे.