अरविंद केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक; ‘आप’ भाजपचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

Delhi Assembly Elections 2025: दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या हालचाली जोरात आहेत. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, नवी दिल्ली विधानसभेतील आपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावरून जाताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावरील काही लोक त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करतात. मुख्यमंत्र्यांची काळी गाडी पुढे जात असतानाच पोलिस त्या लोकांना रस्त्यावरून हटवतात. तेवढ्यात एक दगड गाडीवर कोणीतरी फेकल्याचे दिसत आहे.
BJP Goons try to kill Arvind Kejriwal. Huge stones thrown at the Car of AAP National Convener.
Two days ago, Security Agencies had warned of a terror attack against Arvind Kejriwal and had asked Central Govt to increase his security.
BJP working with Terror Groups? pic.twitter.com/mQi4Wg3l8p
— Dr Ranjan (@AAPforNewIndia) January 18, 2025
आप कार्यकर्त्यांनी भाजपवर आरोप केला –
व्हिडिओमध्ये यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे सरकतो. या संपूर्ण घटनेवर आप कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. भाजप पराभवाच्या भीतीने नाराज आहे आणि त्यामुळेच केजरीवालांवर हल्ला करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
#WATCH | Delhi: BJP Candidate Parvesh Verma shares a video, accusing Arvind Kejriwal’s car of crushing a BJP worker, resulting in a broken leg. Verma says he’s heading to Lady Hardinge Medical College to inquire about the worker’s health, calling the incident “very shameful.” pic.twitter.com/QBa9LNQPY7
— Organiser Weekly (@eOrganiser) January 18, 2025
भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी हा दावा केला –
त्याचवेळी, या संपूर्ण प्रकरणावर भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी एक व्हिडिओ जारी करून ‘आप’वर जोरदार प्रहार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची गाडी भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. नवी दिल्ली विधानसभेत लोक भाजपला विजय मिळवून देत आहेत, त्यामुळे ‘आप’ असे कारस्थान रचत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.




