Arvind Kejriwal : लोकसंख्या 50 कोटींवर आणली जाईल; केजरीवाल यांचा निवडणूक आयोगावर निशाणा
निवडणूक आयोग मतदारयाद्या पडताळणीच्या (एसआयआर) माध्यमातून लोकसंख्या घटवून ५० कोटींवर आणून ठेवेल, असे टीकास्त्र आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोडले.

Arvind Kejriwal : केंद्र सरकार लोकसंख्येविषयी विनाकारण चिंता करत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १४० कोटी इतकी आहे. निवडणूक आयोग मतदारयाद्या पडताळणीच्या (एसआयआर) माध्यमातून लोकसंख्या घटवून ५० कोटींवर आणून ठेवेल, असे टीकास्त्र आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोडले.
आधीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत सुमारे १ कोटी ४५ लाख मतदार होते. निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम राबवून दिल्लीसाठीच्या प्रारूप मतदारयाद्या जारी केल्या. त्यामुळे तब्बल ४७ लाख मतदारांची नावे वगळल्याचे समोर आले.
त्यानंतर सोशल मीडियावरून उपरोधिक प्रतिक्रिया देत केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. प्रारूप याद्यांनुसार दिल्लीतील मतदारांची संख्या ९७ लाखांपर्यंत खाली आली आहे.
त्यामुळे एसआयआरनंतर दिल्लीतील तब्बल ३३ टक्के मतदारांचा पत्ता याद्यांमधून कट झाला आहे. एआयआर राबवण्यात आलेल्या देशातील राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता ते प्रमाण प्रारूप याद्यांच्या स्तरावर सर्वांधिक ठरले आहे.
दिल्लीतील सरासरी तीनपैकी एका मतदाराचे नाव याद्यांमधून वगळले गेले आहे. अस्सल मतदारांनाही वगळले जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सातत्याने एसआयआरवर आक्षेप घेत आहेत. आता दिल्लीच्या प्रारूप मतदारयाद्यांवरून मोठे राजकीय (Arvind Kejriwal) वादळ घोंघावण्याची शक्यता आहे.






