Arvind Kejriwal on pm modi। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील शाळांना वारंवार मिळणाऱ्या बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ,”ते इतके असहाय्य का आहेत? असा सवाल करत पंतप्रधानांना काहीतरी करण्याचे आवाहन केले. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर लिहिले, “पंतप्रधानजी, काहीतरी करा. १.४ अब्ज लोकांचे पंतप्रधान इतके असहाय्य का आहेत? तुम्ही काहीही हाताळू शकत नाही?”असे सवाल केले आहेत. मुलांचे पालक दररोज भीतीत जगतात Arvind Kejriwal on pm modi। या अगोदर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी, “दिल्लीतील शाळांना वारंवार बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे अराजकता निर्माण होते, शाळांना सुट्ट्या मिळतात आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भीती निर्माण होते, तरीही एक वर्षापासून कोणालाही पकडण्यात आले नाही आणि कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. चार इंजिन असलेले भाजप सरकार राजधानीची सुरक्षा राखण्यासही असमर्थ आहे. पालक दररोज भीतीत जगतात.” हे सर्व कधी संपेल?”असे म्हणत थेट केंद्र सरकारवर हल्लबोल केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीतील शाळांना धमक्या मिळत आहेत. दरम्यान, शनिवारी दिल्लीतील अनेक शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली. पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि शाळा रिकामी केल्या. अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल मिळाले, ज्यामुळे घबराट पसरली. पोलीस आणि सुरक्षा संस्था सतर्क Arvind Kejriwal on pm modi। धमक्या मिळालेल्या शाळांमध्ये नजफगडमधील कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल, कुतुबमिनार येथील सर्वोदय वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि द्वारका येथील डीपीएस स्कूल यांचा समावेश आहे. धमक्या मिळाल्यानंतर लगेचच, दिल्ली पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. कोणत्याही शाळांमधून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसली तरी, पोलीस आणि सुरक्षा संस्था दक्षता बाळगत आहेत.