मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही, CBI प्रकरणात न्यायालयीन कोठडी वाढली

दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी सीबीआयशी संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सीबीआय प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ केली. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सीएम केजरीवाल यांच्या कोठडीची मुदत वाढवली आहे.
सीएम केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची आज हजेरी झाली. सीबीआयने केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रावर 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एक्साइज पॉलिसी प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत, तर संजय सिंह यांनाही याच प्रकरणात जामीन मिळाला आहे.




