तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले, – ‘माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी…’

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी संध्याकाळी तिहार तुरुंगातील बॅरेक क्रमांक 3 मधून सुटका करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगाबाहेर मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाच्या समर्थकांनी स्वागत केले. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही तिहार तुरुंगात पोहोचून केजरीवालांचे स्वागत केले.
माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे – केजरीवाल
तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘माझ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे पण प्रत्येक पावलावर देवाने मला साथ दिली आहे. यावेळीही देवाने मला साथ दिली कारण मी प्रामाणिक होतो. यासोबतच ‘माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कारागृहाबाहेरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत रोड शो –
अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेपूर्वी शुक्रवारी तिहार तुरुंगाबाहेर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले. येथे कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. केजरीवाल यांच्या सुटकेनंतर आता तिहार तुरुंग ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत रोड शो करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष –
दारू घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाच-गाणी करून आनंद साजरा केला. याशिवाय आप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडले.
केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती –
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अबकारी धोरण प्रकरणात ईडीने अटक केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 मे रोजी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता आणि 2 जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण केल्यापासून ते तुरुंगात आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही –
सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सांगितले की, ते त्यांच्या कार्यालयात किंवा दिल्ली सचिवालयात जाऊ शकत नाहीत. लेफ्टनंट गव्हर्नरची परवानगी घेणे आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही अधिकृत फाइलवर स्वाक्षरी करू शकत नाही.
#WATCH | After being released from Tihar Jail, Delhi CM and AAP national convener Arvind Kejriwal says, “Today I want to say that I have come out of jail and my courage has increased 100 times…The walls of their jail cannot weaken the courage of Kejriwal…I will pray to god to… pic.twitter.com/AXfgtAYH81
— ANI (@ANI) September 13, 2024
#WATCH | After being released from Tihar Jail, Delhi CM Arvind Kejriwal says, “I have faced many difficulties in my life but God has supported me at every step. This time too God supported me because I was honest, right…” pic.twitter.com/JHwpxY0B8V
— ANI (@ANI) September 13, 2024
#WATCH | Delhi CM and AAP national convener Arvind Kejriwal greets party workers and leaders outside Tihar Jail in Delhi
The Supreme Court granted him bail in the Delhi excise policy case today pic.twitter.com/Ydwlmu6CLN
— ANI (@ANI) September 13, 2024
#WATCH | Firecrackers being burst by AAP workers outside the Tihar jail after Delhi CM Arvind Kejriwal was released from Tihar jail
The Supreme Court granted him bail in the Delhi excise policy case today pic.twitter.com/3iPBR93BiS
— ANI (@ANI) September 13, 2024




