Mumbai : केजरीवाल, भगवंत मान घेणार ‘उद्धव ठाकरें’ची भेट;जाणून घ्या…. काय आहे कारण

मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही राजकीय भेट असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यात उद्धव ठाकरे मुंबईत विरोधीपक्षांची सभा घेण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेची सूत्र अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग तसेच केंद्रातील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की, मार्च महिन्यात देशभरातील विरोधीपक्षांची सभा आयोजित करण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत, अशी माहिती आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/big-relief-to-nawab-malik/
केजरीवाल आणि मान हे दोघेही एक दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि मान हे दोन्ही मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेणार आहेत.





