“दिल्लीत भाडेकरूंनाही मिळणार मोफत वीज-पाणी”; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

Arvind Kejriwal । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आता दिल्लीतील भाडेकरूंनाही मोफत वीज आणि पाण्याचा लाभ मिळणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
याविषयी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी, “जर आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही अशी योजना आणू ज्याअंतर्गत भाडेकरूंनाही मोफत वीज आणि पाणी मिळेल.” असे म्हटले. तसेच,”पूर्वांचलमधील लोकांना या योजनेचा खूप फायदा होईल” असेही केजरीवाल यांनी म्हटले.
माहितीपटावरील बंदीबद्दल केजरीवाल म्हणाले Arvind Kejriwal ।
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पक्षाने एक माहितीपट बनवला आहे. त्याचे नाव अनब्रेकेबल आहे. याची स्क्रीनिंग होणार होती पंरतु, पोलिसांनी त्यावर बंदी घातली आहे. माहितीपटावर बंदी घातल्यानंतर, अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की भाजपने त्याचे प्रदर्शन थांबवले आहे.
भाजप घाबरले आहे म्हणून Arvind Kejriwal ।
अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम्हाला कोणाची परवानगी घ्यावी लागते?” हा प्रसिद्धीचा विषय नव्हता. दिल्ली पोलिसांनी याची स्क्रिनींग थांबवली. ही काही राजकीय घटना नव्हती. पत्रकारांसाठी ही एक स्क्रीनिंग होती. भाजप घाबरले आहे म्हणून स्क्रीनिंग बेकायदेशीरपणे थांबवण्यात आले. भाजपच्या कटांना आपण कसे तोंड दिले हे दाखवण्यासाठी हा माहितीपट होता. खाजगी स्क्रीनिंगसाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक नाही. आम्ही कोणतेही प्रमोशन करत नव्हतो.” असे केजरीवल यांनी म्हटले.
दरम्यान , अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी, ‘निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असल्याने, राजकीय पक्षांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात (डीएम ऑफिस) सिंगल विंडो सिस्टीमद्वारे परवानगीसाठी अर्ज करावा लागेल.’ निवडणुकीदरम्यान ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाकडून अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे ते मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन ठरेल. आम्ही सर्व पक्षांना यावेळी निवडणूक नियम आणि कायदे पाळण्याचे आवाहन करतो” असे सांगितलेआहे.
हेही वाचा
अरविंद केजरीवालांविरुद्ध राहुल गांधींचा ‘रोड शो’ ; प्रियांका गांधींनाही होणार सहभागी?, काँग्रेसने आखली खास योजना
“माझ्या वडिलांना पुन्हा मुख्यमंत्री करा ….” ; नितीश कुमार यांच्या मुलाकडून पहिल्यांदाच जनतेला आवाहन





