“१६ तासात आमच्या १६ उमेदवारांना भाजपकडून १५ कोटींची ऑफर” ; अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

Arvind Kejriwal । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आजचा एकच दिवस उरलेला आहे. उद्या दिल्लीत सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे. मात्र त्या अगोदरच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी,”आम आदमी पक्षाच्या १६ उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपाने मंत्रीपद आणि १५ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली आहे” असा मोठा दावा केला आहे.
१६ तासात आमच्या १६ उमेदवारांना फोन Arvind Kejriwal ।
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या पोस्टमध्ये, “काही एजन्सी दाखवत आहेत की शिवीगाळ करणाऱ्या पक्षाला ५५ हून अधिक जागांवर विजय मिळत आहे. गेल्या १६ तासात आमच्या १६ उमेदवारांना फोन आले आहेत की ‘आप’ सोडून त्यांच्या पक्षात या, मंत्री बनवू आणि प्रत्येकाला १५-१५ कोटी देऊ. जर यांच्या पक्षाच्या ५५ हून अधिक जागा येत असतील तर आमच्या उमेदवारांना फोन करण्याची काय आवश्यकता आहे? यावरून हे स्पष्ट आहे की बनावट सर्व्हे करवून घेण्यात आले जेणेकरून वातावरण तयार करत काही उमेदवारांना फोडता येऊ शकेल. पण शिवीगाळ करणाऱ्यांनो आमचा एकही उमेदवार फुटणार नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
कुछ एजेंसीज दिखा रही हैं कि गाली गलौज पार्टी की 55 से ज़्यादा सीट आ रही हैं।
पिछले दो घंटे में हमारे 16 उम्मीदवारों के पास फ़ोन आ गए हैं कि “आप” छोड़ के उनकी पार्टी में आ जाओ, मंत्री बना देंगे और हरेक को 15-15 करोड़ देंगे।
अगर इनकी पार्टी की 55 से ज़्यादा सीटें आ रहीं हैं तो…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 6, 2025
तीन एग्झिट पोलमध्ये काल दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला ४८-४९ टक्के मते मिलेली आणि ७० जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत ४५-६१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ही पोस्ट केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या प्रमाणेच सुलतानपूर माजरा आणि दिल्ली सरकारमधील मंत्री मुकेश अहलावत यांनी देखील ऑफर मिळाल्याचा दावा केला आहे. “मी मेलो, माझे तुकडे केले तरी पण मी अरविंद केजरीवाल यांना कधीही सोडणार नाही,” असे मुकेश अहलावत यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी,“मला या नंबरवरून फोन आला. त्यांनी सांगितलं की, त्यांचे सरकार स्थापन होत आहे, मंत्री बनवू आणि १५ कोटीही देऊ. आप सोडून इकडे या. मी त्यांना सांगू इच्छितो की जो सन्मान केजरीवाल आणि आप पक्षाने मला दिला आहे, मी मरेपर्यंत आपला पक्ष सोडणार नाही”, असेही अहलावत म्हणाले आहेत.
गुरूवारी आपचे खासदार संजय सिंह यांनी देखील पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. त्यांनी दावा केला की, त्यांच्या पक्षाच्या सात आमदारांना भाजपा नेत्यांच्या ऑफरबद्दल एखा व्यक्तीने संपर्क साधला. यामधून दिसून येते की भाजपाने निकालापूर्वीच पराभव मान्य केला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून असे डावपेच खेळले जात आहेत असेही सिंह म्हणाले.
मैं मर जाऊंगा, कट जाऊंगा लेकिन कभी @ArvindKejriwal जी का साथ नहीं छोडूंगा।
मुझे इस नंबर से फ़ोन आया। उसने बोला कि उनकी सरकार बन रही है, मंत्री बना देंगे और 15 करोड़ भी देंगे। “आप” छोड़ के आ जाओ।
मैं इनको कहना चाहता हूँ कि जो इज़्ज़त केजरीवाल जी ने और “आप” पार्टी ने मुझे दी है,… pic.twitter.com/ZrqIC0R4WD
— Mukesh Ahlawat (@mukeshahlawatap) February 6, 2025
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी आप नेत्यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. हे आपच्या निवडणुकीतील पराभवाबद्दलच्या निराशेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. संजय सिंह यांनी त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे विरेंद्र सचदेवा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
उद्या दिल्ली विधानसभेचा निकाल Arvind Kejriwal ।
बुधवारी दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. तर शनिवारी (फेब्रुवारी ८) मतमोजणी केली जाणार आहे. सध्या या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दिल्लीत आप सलग तिसर्यांदा सत्तेत येणार की भाजपा २७ वर्षांची प्रतिक्षा संपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





