चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करून अरूणाचल प्रदेशातील तरुणाचे केले अपहरण
Updated On:

इटानगर – चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करून अरुणाचल प्रदेशातील एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. चीनच्या पीएलए म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मीने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातून हे अपहरण करण्यात आले असून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला चिनी सैनिकांनी उचलून नेल्याचा आरोप या भागातील खासदार तापीर गाओ यांनी केला आहे. यानंतर भारतीय लष्कराने तातडीने पीपल्स लिबरेश आर्मीशी संपर्क साधला आहे.





