‘रामायण’चं शूटिंग करताना खूप सिगारेट ओढायचे अरुण गोविल, एके दिवशी चाहत्याने पाहिलं अन्…

मुंबई – रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने लोकांच्या हृदयावर अशी छाप सोडली, जी आजही पुसून टाकणे कठीण आहे. श्री रामाचे जीवन पडद्यावर अनेकवेळा दाखवण्यात आले आहे, परंतु टीव्ही सीरियल ‘रामायण’ची जागा कोणीही घेऊ शकलेले नाही.
रामायणाबाबत चाहत्यांमध्ये अशी क्रेझ होती की, प्रत्येक पात्राला देवाचे रूप मानले जात होते. लोक खरोखरच अरुण गोविल यांची भगवान श्रीरामांप्रमाणे पूजा करू लागले. लोकांनी घरातील मंदिरात त्यांची फोटो सजवली होती.
एवढेच नाही तर, अरुण गोविल समोर भेटायचे तेव्हा भावनेच्या भरात लोक त्यांच्या पाया पडत. मात्र तुम्हाला माहित आहे का की अरुण यांना त्याच्या एका सवयीमुळे खूप शिव्या ऐकाव्या लागल्या. अरुण गोविल यांनी स्वतः द कपिल शर्मा शोमध्ये याचा खुलासा केला होता.
अरुण गोविल शोमध्ये त्यांच्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. रामायणाशी संबंधित कालखंडाबद्दल सांगितले की,’एकदा तामिळ चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्यांनी धुम्रपान करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात अरुण गोविल यांनी भगवान बालाजीची भूमिका साकारली होती. शूटिंगच्या वेळी अरुण यांनी कोपऱ्यात जाऊन धूम्रपान सुरुवात केली अशात तिथून एक व्यक्ती जात असताना अरुण हे धूम्रपान करताना दिसले. अरुण यांना सिगारेट ओढताना पाहून त्या व्यक्तीला खूप राग आला. तो व्यक्ती तमिळमध्ये बोलत होता, मात्र त्याचे हावभाव पाहून त्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केल्याचे अरुण यांना समजले.
अरुण यांनी सेटवर त्या व्यक्तीने काय बोलले याचा अर्थ विचारला तेव्हा कळले की,’ती व्यक्ती त्याला सांगत होती, आम्ही तुला देव मानतो आणि तू इथे बसून सिगारेट पीत आहेस..’ ही गोष्ट अरुण यांच्या मनाला भिडली. ते शब्द अरुण यांच्या मनाला इतके लागले की त्यांनी पुन्हा सिगारेटला हातही लावला नाही.





