Arshdeep Singh Record : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! भुवनेश्वर कुमारचा ४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत बनला भारताचा नंबर-१ गोलंदाज
Arshdeep Singh Record : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुसरी विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

Arshdeep Singh Breaks Bhuvneshwar Kumar Record for Most T20I Wickets in a Calendar Year : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या थरारक लढतीत भारतीय संघाने ४ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजांनी दमदार मारा करत न्यूझीलंडला २० षटकांत १८० धावांवर रोखले. या सामन्यात भारताचा आघाडीचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने अप्रतिम गोलंदाजी करत २ महत्त्वाच्या विकेट् घेतल्या. या चमकदार कामगिरीच्या बळावर अर्शदीपने भुवनेश्वर कुमारचा ४ वर्षे जुना विक्रम मोडला.
भुवनेश्वरचा मागे टाकत अर्शदीप बनला भारताचा नंबर-१ गोलंदाज –
क्राइस्टचर्चच्या मैदानावर अर्शदीपने आपल्या ४ षटकांत ३३ धावा देत २ विकेट्स मिळवल्या. यासह त्याने २०२६ या वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एकूण ३८ विकेट्सचा टप्पा गाठला. ज्यामुळे तो एकाच कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सहकारी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा २०२२ मधील ३७ विकेट्स चार वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे, अर्शदीपने यापूर्वी २०२४ मध्ये ३६ आणि २०२२ मध्ये ३३ विकेट्स मिळवल्या होत्या, तर वरुण चक्रवर्तीने २०२५ मध्ये ३६ विकेट्स टिपले होते. आता अर्शदीप या सर्वांना मागे टाकून भारताचा ‘नंबर वन’ गोलंदाज बनला आहे.
एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:
Milestone 🔓
3⃣8⃣ and counting! 👌 👌
@arshdeepsinghh now has the most T20I wickets for a #TeamIndia cricketer (in Men’s cricket) in a calendar year! 🙌 🙌
Updates ▶️ https://t.co/FZtUFIFWS2
#NZvIND https://t.co/J6HQa8JJp1
— BCCI (@BCCI) October 24, 2026
- अर्शदीप सिंग : ३८ विकेट्स (वर्ष २०२६)
- भुवनेश्वर कुमार : ३७ विकेट्स (वर्ष २०२२)
- अर्शदीप सिंग : ३६ विेकेट्स (वर्ष २०२४)
- वरुण चक्रवर्ती : ३६ विेकेट्स (वर्ष २०२५)
- अर्शदीप सिंग : ३३ विकेट्स (वर्ष २०२२)
- अक्षर पटेल : ३२ विेकेट्स (वर्ष २०२६)
जागतिक विक्रमापासून आता केवळ ३ पावलं दूर –
आयसीसीच्या पूर्ण सदस्य (Full Member) देशांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम सध्या आयर्लंडच्या जोशुआ लिटलच्या नावावर आहे; त्याने २०२२ मध्ये ३९ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा (३८ विकेट्स , २०२४) आणि भारताचा अर्शदीप सिंग (३८ विकेट्स , २०२६) हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. अर्शदीपने चालू मालिकेत आणखी ३ विकेट्स टिपल्यास तो जोशुआ लिटलला मागे टाकून जागतिक स्तरावर अव्वल स्थानी विराजमान होईल.
न्यूझीलंडच्या भूमीवर भारताचा दबदबा –
पहिल्या लढतीनंतर दुसऱ्या सामन्यातही मिळालेल्या या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. अर्शदीपने सुरुवातीलाच टिम सेफर्टला बाद करून न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले होते. चालू वर्षातील त्याचा हा भेदक फॉर्म पाहता आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.





