प्रभासचा ‘जोकर’ म्हणून उल्लेख केलेल्या विधानावर अर्शद वारसीने दिले स्पष्टीकरण

Arshad Warsi | अभिनेता अर्शद वारसीने ‘कल्कि २८९८ एडी’ सिनेमातील प्रभासने साकारलेल्या भूमिकेवर टीका केली होती. अर्शदने प्रभासला ‘जोकर’ म्हंटले होते. अर्शदच्या या वक्तव्यावर साउथ इंडस्ट्रीत चांगलाच गदारोळ झाला होता. भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक स्टार्सनी अर्शदवर टीका केली. अखेर या वादानंतर अर्शदने त्याच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. Arshad Warsi |
“प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो मी जे काही बोललो ते कल्कि २८९८ एडीमध्ये प्रभासने जी भूमिका साकारली आहे त्याबद्दल बोललो. त्याने जी भैरव ही भूमिका साकारली त्याबद्दल बोललो. मी त्याच्यावर व्यक्तिशः कोणतीही टीका केली नाही. तो एक हुशार अभिनेता आहे आणि त्याने स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले आहे आणि आम्हाला याची जाणीव आहे,” असे अर्शद वारसीने म्हंटले.
जेव्हा आपण एखाद्या चांगल्या अभिनेत्याला अशी वाईट भूमिका करताना पाहतो तेव्हा प्रेक्षकांना खूप दुःख होतं, असेही त्याने यावेळी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्शदने समदीश भाटियाच्या मुलाखतीत “मला कल्की 2898 एडी हा सिनेमा आवडला नाही. यात प्रभासला जोकर बनवण्यात आले आहे. मला मॅड मॅक्स सिनेमासारखं काहीतरी बघायला मिळेल याची अपेक्षा होती. मी तिथे मेल गिब्सनसारख्या कलाकाराला इमॅजिन करतोय. पण प्रभासने काहीतरी वेगळंच केलं. तो असं का करतो, मला खरंच कळत नाही,” असे म्हंटले होते.
दरम्यान, कल्की 2898 एडी 27 जून रोजी रिलीज झाला. या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत.





