Pune District : मरकळ बाजारात पालेभाज्याची आवक
Updated On:

चिंबळी : मरकळ (ता. खेड) येथे गुरुवार (दि. 2) ते शनिवार (दि. 4) पर्यंत जय हनुमान भैरवनाथ महाराजांच्या उत्सवा निमित्त आडवडे बाजारात यात्रे निमित्त पालेभाज्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.
ग्राहकांनी पालेभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. कांदा 50, बटाटा 40, कोबी 25, वटाणा 100, मिरची 70, वांगी 40, टोमॅटो 30, शेवगा 100, घेवडा 80, पावटा 80, गवारी 80, सरपंरचद 150, कलिंगड 30 रुपये किलो तर मेथी 15, कोथींबीर 10 रुपये जुडीने विकण्यात आले.





