पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद
Updated On:
पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली.
मंदार श्रीधर दारवटकर (वय 24, रा. रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दारवटकर याच्या मित्राविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस नाईक गोविंद पवार यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दारवटकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्यांने आणि त्याच्या मित्राने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगले होते.
त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वडगाव बुद्रुक भागात सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे तपास करत आहेत.





