satara | पिस्तूल घेऊन यात्रेत दहशत माजवणार्यास अटक

कराड, (प्रतिनिधी) – कोरेगाव, ता. कराड येथील यात्रेत पिस्तूल दाखवत दहशत माजवणार्या निखिल शशिकांत थोरात (वय 25, रा. नांदलापूर, ता. कराड) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, असा 70 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरेगाव, ता. कराड येथील यात्रेत झालेल्या गर्दीमध्ये एक युवक पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या आदेशानुसार सपोनि सुधीर पाटील यांच्या पथकाने काल (दि. 25) रात्रीच्या कार्वे व कोरेगाव परिसरात गस्त सुरू केली होती. त्यावेळी एक युवक कोरेगावकडून चालत येताना दिसला.
पोलिसांनी संशयावरून, त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सपोनि सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सुधीर बनकर, विजय कांबळे, संजय शिर्के,
अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, कराड तालुक्याचे सपोनि अभिजित चौधरी, अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळी यांनी ही कारवाई केली.





