Disha Salian case : आदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा; दिशा सालियनच्या वडिलांची मागणी म्हणाले “सत्याचा पराभव…”
Disha Salian case : जबाब नोंदवल्यानंतर दिशाचे वडील सतीश सालियान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Disha Salian case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले होते. काही त्रुटीही निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर आता CBI कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जबाब नोंदवल्यानंतर दिशाचे वडील सतीश सालियान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या मागणीमुळे खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती यांना आताच्या आता अटक करा आणि जी शिक्षा असेल ती सुनवा, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मुलीसोबत जे घडलं, त्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्याचा पराभव होऊ शकत नाही. जिथे सत्य असतं, तिथे देव असतो. त्यामुळे न्याय मिळेल.
CBI अधिकाऱ्यांनी आपण मांडलेले मुद्दे आणि घेतलेली नावं नोंदवून घेतले असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात कार्यवाही सुरू केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सतीश सालियान यांनी सांगितले “जे फॅक्ट आहे, जे माझ्या मुलीसोबत घडलं, तेच सर्व मी अधिकाऱ्यांना सांगितलं. सत्याचा पराभव होऊ शकत नाही. जिथे सत्य असतं, तिथे देव असतो. त्यामुळे न्याय मिळेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
CBI चौकशीत काय समोर येते, याकडे लक्ष
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरण गेल्या काही वर्षांपासून राजकीय आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. या प्रकरणात वेळोवेळी विविध दावे आणि आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिचे वडील सतीश सालियान यांनी केली होती. ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. आता त्यांच्या जबाबाच्या आधारे CBI पुढील तपासात कोणती पावलं उचलते, कोणाची चौकशी केली जाते आणि तपासातून नेमकं काय समोर येतं, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
८ जून २०२० रोजी मुंबईत झालेल्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंबई येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली आणि तपासानंतर तिचा मृत्यू आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचा दावा करण्यात आला.
Leopard Death : कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार






