लष्कर प्रमुखांनी घेतला लडाखमधील नियंत्रण रेषा स्थितीचा आढावा; यंत्रणेत काळानुरूप अपेक्षित बदलांवर चर्चा

लेह (लडाख) – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे ( Army Chief General Manoj Pandey) यांनी शुक्रवारी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील एकूण सुरक्षा परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यावेळी त्यांना लेहमधील फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या मुख्यालयात सैन्याच्या तयारीबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली.(Army General Pande reviews security situation in eastern Ladakh)
यावेळी लष्कर प्रमुखांनी सैन्यदलांचे त्यांच्या व्यावसायिकतेबद्दल, अटूट बांधिलकी आणि कर्तव्याप्रती समर्पण या बद्दल त्यांचे कौतुक केले. दरम्यान लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ९ मे रोजी झालेल्या एका परिवर्तन चिंतन बैठकीत लष्कराच्या एकूणच सज्जतेचा आढावा घेतला.
यावेळी लष्कराच्या बहुतेक सर्व महत्वाच्या विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. लष्करी यंत्रणेत काळानुरूप जे बदल अपेक्षित आहेत त्यावरही यावेळी चर्चा झाली. लष्कराशी संबंधीत विविध समितींच्याही प्रमुखांनी यावेळी जनरल चौहान यांना विविध सुचना सादर केल्या.





