Armed men kidnap Passengers। पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बंदुकीच्या धाकावर काही प्रवाशांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लोकांचे अपहरण केल्यानंतर त्यांना एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले, त्यानंतर नऊ जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बलुचिस्तान प्रांतातील आहे. बलुचिस्तान प्रांताचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी या घटनेविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना त्यांनी ,”गुरुवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी अनेक बसमधील प्रवाशांचे अपहरण केले. हल्लेखोर लोकांना सोबत घेऊन गेला आणि त्यांची हत्या केली” अशी माहिती दिली. आणखी एक सरकारी अधिकारी नवीद आलम यांनी, “रात्रीच्या वेळी लोकांचे मृतदेह सापडले. त्यांचे मृतदेह गोळ्यांनी सजलेले होते. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही” असे म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अशा घटना बलुचिस्तान दहशतवाद्यांनी घडवून आणल्या आहेत. या हल्ल्याबाबत संशयाची सुई बलुचिस्तान बंडखोरांवर आहे. प्रत्यक्षात बलुचिस्तान बंडखोर पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. बलुचिस्तान बंडखोर केवळ पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत नाहीत तर ते त्यांच्या भूमीवरील चिनी प्रकल्पांनाही विरोध करत आहेत.Armed men kidnap Passengers। बलुचिस्तानचे म्हणणे आहे की, चीन त्यांच्या संसाधनांची लूट करत आहे. बलुचिस्तानला चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडणाऱ्या सीपीईसी प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी कामगारांवरही बलुचिस्तान बंडखोरांनी अनेक हल्ले केले आहेत. बलुचिस्तान हा संसाधनांनी समृद्ध प्रदेश आहे, जिथे नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे आणि इतर मौल्यवान खनिजे आहेत. बलुचिस्तानचा असा विश्वास आहे की पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे या खनिजांची लूट करत आहेत आणि बलुचिस्तानचे शोषण केले जात आहे. यापूर्वी, ११ मार्च रोजी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले. त्यावेळी ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते. सैनिक त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारवर दबाव आणत होते. या घटनेत, सैनिकांनी १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २६ जणांना ठार मारले. Armed men kidnap Passengers।