Armaan Malik : मृत्यूच्या दारातून परतला ‘अरमान मलिक’; बिग बॉस फेम कलाकार अपघातातून थोडक्यात बचावला

Armaan Malik | Accident – बिग बॉस ओटीटी सीझन 3 फेम युट्युबर ‘अरमान मलिक’ याचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातून अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका यांच्यासह ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे.
अरमान मलिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत अपडेट शेअर केली आहे. युट्युबरअरमान मलिकने दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये एन्ट्री घेतली, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. तो मनालीला एका गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता.
View this post on Instagram
तेथून परतत असताना त्यांच्या नवीन गाडीचा टायर फुटला. या भीषण अपघातात त्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागला असता, मात्र ते थोडक्यात बचावले. अरमान मलिकचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरमान म्हणतो, ‘एक आठवड्यापूर्वी मी या कारची तक्रार केली होती. आज आमच्यासोबत दुर्घटना घडली.
आज आम्ही शूटिंग करून मनालीहून परत येत होतो, तेव्हा गाडीचा पूर्ण टायर फुटला. आम्ही मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावलो आहोत. मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता.
कृतिका मागच्या सीटवर बसली होती”. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज आम्ही मरता-मरचा वाचलो आहोत.’ यानंतर त्याने सगळ्यांना गाडीचं नाव सांगत ही गाडी न घेण्याबद्दल सांगितलं.





