लग्न न करता गरोदर राहिलेल्या अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली…

मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल खासगी आयुष्यासाठी अधिक चर्चेत असतो. लवकरच अर्जुन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अर्जुनची प्रेयसी गॅब्रियला डिमेट्रियड्स हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून गर्भवती असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप या दोघांनी लग्न केले नसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मात्र आता अर्जुनची प्रेयसी गॅब्रियला डिमेट्रियड्सने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
गॅब्रिएलाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. एका नेटकऱ्याने कमेन्ट करत लिहिले की, “तुम्ही लग्न कधी करणार? तू भारतात राहतेस. तू जिथे जन्म झाला तिथे राहत नाहीस. तुम्ही सगळे तरुणाईची मानसिकता खराब करता.” तर यावर गॅब्रिएलाने सडेतोड उत्तर दिले आहे. तिने लिहिले की, ‘येथील मानसिकता कशी काय खराब होते. काहीही सांगून वातावरण दुषित करण्याची सवयच आहे. मी असे केल्याने तुम्हाला अडचण काय अडचण होणार आहे?” सध्या गॅब्रिएलाने दिलेल्या या प्रत्युत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अर्जुन हा घटस्फोटित असून त्याने पहिलं लग्न 1998मध्ये मेहेर जेसिया या सुपर मॉडेलशी विवाह केला होता. या लग्नात त्याला महिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत. अर्जुन-मेहेर यांनी 2019मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अर्जुन दक्षिण आफ्रिकन प्रेयसी गॅब्रिला डॅमॉट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव एरिक असून तो तीन वर्षांचा आहे.





