अर्जुन कपूरच्या नवीन चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्रींसोबत झळकणार

Arjun Kapoor New Movie: बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेचे प्रेक्षक आणि समिक्षकांनी कौतुक केले होते. आता अर्जुनने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. तो लवकरच ‘मेरे हसबंड की बीवी’ या कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
अर्जुन कपूर सिंघम अगेन चित्रपटानंतर ‘मेरे हसबंड की बीवी’मध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. अर्जुनसोबतच या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकूल प्रीत सिंग या दोघी प्रमूख भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
अर्जुनच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 ला रिलीज होईल. ‘लव्ह ट्रँगल नही सर्कल है’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. यावरूनच यामध्ये प्रेक्षकांना प्रेमाचा ट्रँगल पाहायला मिळेल.
पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली असून वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी हे याचे निर्माते आहेत. मुदस्सर अजीझ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधीच्या चित्रपटात अर्जुनने खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. आता नवीन चित्रपटात अभिनेता चाहत्यांना हसवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाला रिलीजनंतर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.


