न्यूयॉर्क : पृथ्वीशिवाय विश्वात जीवन आहे का? एलियन्स खरच अस्तित्वात आहेत का? शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत, परंतु अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचा अहवाल विश्वात एलियनचे अस्तित्व असल्याचे दर्शवित आहे. यासोबतच तो मानवांवरही लक्ष ठेवून आहे. पेंटागॉनचे वरिष्ठ अधिकारी आणि हॉवर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ अवी लोएब यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणतात की आपल्या शेजारच्या आकाशगंगांमध्ये अनेक एलीयन यान आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्याप्रमाणे आपण इतर ग्रहांवर यान पाठवून माहिती गोळा करतो, त्याचप्रमाणे एलियन्सही छोट्या यानांमधून आपल्यावर लक्ष ठेवून असतात. तेदेखील माणसांची माहिती गोळा करत असतात. अवकाशात एक विचित्र वस्तू पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. एक अज्ञात सिगार आकाराची वस्तू आपल्या सौरमालेतून गेली. या अज्ञात वस्तूचे नाव उमू-आउमा आहे, ज्याचे शास्त्रज्ञांनी आधी धूमकेतू म्हणून वर्णन केले होते. तथापि, त्याच्या मागे वायू किंवा धुळीची कोणतीही रेषा नव्हती, जी इतर धूमकेतूंमध्ये नसते. ही वस्तू असामान्यपणे सूर्यापासून दूर जात होती आणि तिची हालचाल इतर धूमकेतूंपेक्षा पूर्णपणे वेगळी होती, जी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. त्याआधारे तो धूमकेतू नसल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ एवी लोएब म्हणतात की हा धूमकेतू नसून एलियन यान होता. शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या सौरमालेत एक मोठे एलियन स्पेसशिप असू शकते. यासोबतच ते पृथ्वी आणि इतर ग्रहांकडे लहान एलियन स्पेसक्राफ्ट पाठवत असावेत. जेणेकरुन ते माणसांबद्दल अधिक माहिती गोळा करू शकतील. तथापि, शास्त्रज्ञ एवी लॉब यांच्या मते, स्पेसशिप पाठवणारी एलियन सभ्यता जिवंत असेलच असे नाही. एका अंदाजानुसार, उमू-ओमा नावाचा हा पिंड लाखो वर्षे जुना असू शकतो आणि पृथ्वीच्या जन्मापूर्वी पाठवण्यात आला असावा. पण पेंटागॉनच्या या ड्राफ्ट रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यांची पडताळणी होणे बाकी आहे.