‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपटात दिसणार ‘आर्ची’; सिद्धार्थ जाधवने शेअर केले फोटो

Saade Maade Teen Sequel | अभिनेते मकरंद अनासपुरे, अशोक सराफ आणि भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला ‘साडे माडे ३’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. याचे फोटो अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह या चित्रपटात दोन चेहरे झळकणार आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसंच अभिनेता संकेत पाठक देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. Saade Maade Teen Sequel|
View this post on Instagram
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चित्रपटाच्या टीमबरोबर रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक दिसत आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, “‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ पुन्हा एकदा’ महाराष्ट्रातल्या मेगा सुपरस्टार्सबरोबर काम करायचा योग… अशोक सराफ सर, मकरंद अनासपुरे सर, भरत जाधव सर…’पुन्हा एकदा’ @avkpictures_ अमेय खोपकर सरांबरोबर एसोसिएशन…’पुन्हा एकदा’ जुन्या मित्रांबरोबर नवीन काम, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक…’पुन्हा एकदा’ संजय जाधव सरांच्या नजरेतून दिसण्याचा योग…’पुन्हा एकदा’ अंकुश चौधरी सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी आणि ‘पुन्हा एकदा’ मायबाप रसिकांना आनंद देण्याचा घेतलेला वसा, खूप आनंदी आणि उत्साही…लवकरच भेटू.” असे लिहीत सिद्धार्थने या चित्रपटाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. Saade Maade Teen Sequel|
दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेता अंकुश चौधरीचं करणार आहे. तसंच चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव सांभाळणार आहेत. 17 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. या चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स सगळ्यांनाच भावले होते. आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाद्वारे नव्या कलाकारांसोबत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा :





