Nagar | आदिवासी विकास आराखडा मंजूर करा- आ. कानडे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- पारधी विकास आराखड्याप्रमाणे आदिवासी विकास आराखडा मंजूर करावा, यासाठी आपण विधीमंडळ अधिवेशनात शासनाकडे हट्ट धरला. आराखड्यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती करून संघर्ष करावा लागेल. त्यावेळी आपण तुमच्यासोबत असू, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
आदिवासी दिनानिमित्त आदिवासी भिल्ल हक्क अधिकार परिषद महासभेच्यावतीने संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित भिल्ल विकास आराखडा व आदिवासींचे हक्क अधिकार परिषद व रोजगार मेळाव्यात अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना आ. कानडे बोलत होते.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक कानडे, सतीश बोर्डे, सरपंच अशोक भोसले, सरपंच सागर मुठे, हरिभाऊ बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, आदिवासी महासभेचे संस्थापक सचिव कैलास माळी, कृष्णा सोले (वैजापूर), बबन आहेर व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, शासनाच्या जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या आदिवासींची अतिक्रमणे नियमानकुल करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. कोणताही आदिवासी जातीच्या दाखल्यापासून वंचित राहू नये, यासाठी आपण बैठक घेणार आहोत. आपले प्रश्न सुटण्यासाठी आदिवासी मुला-मुलींनी शिक्षणाची कास धरली पाहिजे.
यावेळी रामेश्वर जाधव, बाळासाहेब माळी, रामबाबा बोर्डे, अंबादास गोलवड, गेनूतात्या माळी, भाऊसाहेब पवार, मीराताई गोलवड, छबुबाई आहेर, अलका पवार, शीला मोरे, चंद्रकला माळी, नंदा माळी, अक्षय निकम,
मोहित गांगुर्डे, रामदास पवार, सचिन माळी, अजय खंडागळे, लक्ष्मण बर्डे, मंगल माळी, वैष्णवी माळी, दिपाली गांगुर्डे, माया गांगुर्डे, सुरेखा बर्डे, उषा पवार, यमुना आहेर, झुंबरबाई पवार, कल्पना पवार, शारदा आहेर, संगीता जाधव यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





