13,165 कोटींच्या संरक्षण खरेदीला मान्यता
Updated On:

नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाने 13 हजार 165 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याच्या खरेदीला बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे भारताच्या लष्करी सिध्दतेत मोलाची भर पडणार आहे. यातील 87 टक्के साहित्याची भारतात निर्मिती केली जाणार आहे.
यात हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्सकडून 25 एलएच हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहेत. भारतीय बनावटीच्या हेलीकॉप्टरच्या खरेदीची किंमत तीन हजार 8540 कोटी रुपयांच्या घरात जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला.
क्षेपणास्त्रांच्या दारूगोळ्याची चार हजार 962 कोटी रुपयांची खरेदी करण्यात येणार आहे. हा दारूगोळा भारतात निर्माण करण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे चालना मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.





