श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

आळंदी – विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचे ज्ञान वाढीस लागावे व हिंदी भाषेचा सर्वत्र प्रचार प्रसार व्हावा करिता १४ सप्टेंबर ‘हिंदी दिन’ देशभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदी पखवाड्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध, वकृत्व, गीत / काव्य गायन, रांगोळी इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या कौशल्याच्या बळावर यश संपादन केले. यानिमित्ताने या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्प, प्रशस्तीपत्र, टिफीन डबा व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी मनोगत व्यक्त केले, वडगावकर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर आपले व संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, सर्वांना शुभेच्छा. तसेच कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये हिंदी विभाग प्रमुख अल्लाबक्ष मुलाणी यांनी हिंदी कार्यक्रमाचा हेतू सांगून भाषेचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अध्यापक श्रीरंग पवार, हिंदी विषय अध्यापक रामदास वहिले, विठ्ठल गुट्टे, गणेश लिखे, रवींद्र शेखरे, वासंती रोकडे, जितेंद्र लोणकर, लतिका बिडवे, सुवर्णा शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिखे यांनी केले व उपस्थितांचे आभार रामदास वहिले यांनी व्यक्त केले.




