श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 4 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकावला पहिला क्रमांक; जिल्हास्तरीयसाठी निवड

आळंदी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व खेड तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने ज्ञानदीप विद्यालय, शिवे येथे शनिवारी (दि. 10 ऑगस्ट) तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. या कुस्ती स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेजच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
14 वर्ष खालील वयोगटात संस्कृती सचिन मुंगसे (42 कि.) वजन गट, ओवी सचिन मुंगसे (46 कि.) वजन गट, तर नागेश्वर विलास पवार (56 कि.) वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर 19 वर्षाखालील गटात ज्ञानेश्वरी घुंडरे (56 कि.) वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला. या चारही कुस्ती खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, क्रीडा विभाग प्रमुख श्रीरंग पवार व क्रीडा शिक्षक राजश्री भुजबळ, प्रकाश पवार, वाय. एस. कांबळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






