नियुक्‍ती सोलापूरला; कर्तव्य मात्र पुण्यात

लेखाधिकाऱ्याला तत्काळ कार्यमुक्‍त करण्याचे आदेश

– तुषार रंधवे

पुणे – राज्य सरकारी सेवेतील सहायक लेखाधिकाऱ्याची बदली सोलापूरला झाली, पण तेथे रुजू न होता तो परस्पर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेत सहायक लेखा अधिकारीपदावर रुजू झाला. ही बाब लक्षात येताच या अधिकाऱ्याला तत्काळ कार्यमुक्‍त करावे. तसेच त्या अधिकाऱ्याचा आतापर्यंतचा कालावधी नियमित न करण्याचे करण्याचे लेखी पत्र लेखा व कोषागारे संचालनालयाने संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

संतोष मडावी हे आरोग्य विभागात (हिवताप, हत्तीरोग व साथीचे रोग) सहायक लेखाधिकारी पदावर कार्यरत होते. राज्य सरकारच्या वित्त विभागाने 27 जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार मडावी यांची बदली सोलापूर येथील राखीव पोलीस बल गट क्र.10 मध्ये करण्यात आली आहे. मात्र, मडावी हे पुणे रोजगार हमी योजना विभागात 1 ऑगस्टला सहायक लेखा अधिकारी पदावर परस्पर रुजू झाले. हा अहवाल रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयाने 14 ऑगस्टला पाठविला.

नियंत्रित अधिकाऱ्यांचा सल्ला धुडकावत रुजू झाल्याचे यातून समोर आले. अधिकाऱ्याच्या या मनमानीची लेखा व कोषागारे संचालक ज.र. मेनन यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुण्याच्या उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालयाला लेखी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये मडावी यांच्या रुजू होण्याच्या अहवालाचा संदर्भ देत, “आमच्या कार्यालयाकडून आपल्या आस्थापनेवर रुजू करुन घेण्याचे आदेश नसतानादेखील आपण मडावी यांना रुजू केले आहे. ही बाब गंभीर आहे. मडावी यांना तत्काळ कार्यमुक्‍त करुन, त्यांचा

1ऑगस्ट 2019 पासूनचा कालावधी नियमित करू नये. त्यांना तत्काळ कार्यमुक्‍त करुन, तसा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.