विभागीय आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती
Updated On:

पुणे – विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश शासनाने काढले.
डॉ. दीपक म्हैसेकर हे दि.31 जुलै रोजी विभागीय आयुक्तपदावरून सेवानिवृत्त झाले. तोपर्यंत हा पदभार सौरभ राव यांच्याकडे होता. अखेर शासनाने बुधवारी सायंकाळी राव यांची नियुक्ती केल्याचे आदेश काढले. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांच्या कारभारावर विभागीय आयुक्त हे नियंत्रण ठेवतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे आहे.





