पिंपरी | चिंचवडचे निवडणूक निरीक्षक म्हणून मनवेश सिंग सिध्दू यांची नियुक्ती

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून मनवेश सिंग सिद्धू यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, ए-३०६, पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९१८८९१०५५६ हा असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५१४८८६ असा आहे. तसेच, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मुकुंद पवार असून त्यांचा संपर्क क्रमांक ८००७२००५८५ असा आहे.
निवडणूक निरीक्षक चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे येथे भेटण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, आज मनवेश सिंग सिद्धू यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन स्विकारण्याच्या ठिकाणाची पाहणी केली आणि निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या.





