पुणे | वडगावशेरी मतदारसंघातून २४ उमेदवारांकडून अर्ज दाखल

पुणे, – वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून एकुण ११२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली त्यातील २४ उमेदवारांनी अर्ज भरून दाखल केले आहेत. २४ उमेदवारांकडून ३४ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.
बापूसाहेब तुकाराम पठारे, सुरेंद्र पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्ष), हुलगेश चलवादी, चंद्रकांत सावंत (बहुजन समाज पक्ष), अशोक जगताप (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), विवेक लोंढे (वचिंत विकास आघाडी), सतीश पाण्डेय (राष्ट्रीय समाज पक्ष),
विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पक्ष), सुनील अंधारे (सैनिक समाज पक्ष), संजय पडवळ (भारतीय नव जवान सेना पक्ष), सचिन कदम (विकास इंडिया पक्ष), शेषनारायण खेडकर (भारतीय जवान किसान पक्ष) या उमेदवारीनी अर्ज दाखल केले आहेत. अभिमन्यू गवळी, राजेश इंद्रेकर, सुनील खांदवे, हारून मुलाणी, शईबाझ हुसैन अब्दुल कय्युम चौधरी, मधुकर गायकवाड, शशिकांत राऊत, विनोद वैरागर, अनिल धुमाळ, आशा चौधरी, बापू बबन पठारे आदींनी अपक्ष उमेदबारी अर्ज दाखल केले आहेत.





