पुणे : म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी अर्जास सुरुवात
Updated On:

पुणे – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने उपस्थित होते. पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीस मंगळवारपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे.
म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.





