Actress Shivani Naik : झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली. या मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईक हिला मोठे फेम मिळाले. या मालिकेत तिने अप्पीची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता शिवानीने तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. लवकरच ती बोहल्यावर चढणार असून तिने आपला जोडीदार निवडला आहे. २६ अॅाक्टोबरला तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. सोशल मीडियावर साखरपुड्यातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. इट्स मज्जा या चॅनेलने शिवानीच्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमधला मकरंद किल्लेदार म्हणजेच अभिनेता अमित रेखी याच्यासोबत तिचा साखरपुडा झाला आहे. गेल्या बराच काळपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमात शिवानीने लाल रंगाची साडी नेसली होती, तर अमित क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे. या साखरपुड्या सोहळ्याला मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर चाहते अभिनंदनाच्या शुभेच्छा देत कमेंट्स करत आहेत. अमित रेखी भाग्य दिले तू मला, पिंगा ग पोरी पिंगा ग, आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. शिवानी आणि अमित या दोघांनी सफरचंद आणि आता कसं करू या नाटकांमध्ये एकत्र काम केले होते. तिथूनच दोघांची ओळख झाली. जेव्हा अप्पी आमची कलेक्टर या मालिकेसाठी शिवानीची निवड झाली होती, त्यावेळी अमितने खास पोस्ट लिहिली होती. हेही वाचा : पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा अन्…; तेजस्वी यादवांकडून घोषणांचा वर्षाव