पुणे | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे युवकांना आवाहन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
या योजनेअंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवार व रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक, आस्थापना जोडले जाणार आहेत. इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतील.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा (इंटर्नशिप) कालावधी हा ६ महिने असेल. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रूपये, आयटीआय, पदविका उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ८ हजार रूपये तर पदवीधर व पदव्युतर पास उमेदवारांना प्रतिमाह १० हजार रूपये इतके विद्यावेतन देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , रास्ता पेठ, या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.





