Pimpri News | अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन..
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
देहूरोड – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम शांततेत व नियमांचे पालन करून पार पाडावा, तसेच डीजेविरहीत जयंती साजरी करावी, असे स्पष्ट आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले. देहूरोड पोलीस ठाण्यात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वावळे, माजी नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, बहुजन विकास आघाडीचे संजय घुतडमल, राजाराम अस्वरे, वैशाली अवघडे, धर्मपाल तंतरपाळे, अजय बखारिया यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





