Apoorva Nemalekar : “ती दिसते पण सगळ्यांना नाही,” अपूर्वा नेमळेकर साकारणार नवी भूमिका
Apoorva Nemalekar: 'पद्मिनी' ही सीरिज 'एआय' आधारित असून त्याची प्रस्तुती अपूर्वानं केली आहे.

Apoorva Nemalekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ‘रात्रीस खेळ चाले…’ या मालिकेत साकारलेल्या शेवंताच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. अलीकडेच ती विवाहबंधनात अडकली. ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यानंतर आता पुन्हा एकदा तिने कामाला सुरुवात केली आहे. ‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजची तिनं घोषणा केली. विशेष म्हणजे ही सीरिज ‘एआय’ आधारित असून त्याची प्रस्तुती अपूर्वानं केली आहे. (Apoorva Nemalekar)
अपूर्वाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. तिने सुंदर साडी नेसली आहे. गळ्यात दागिने घातले आहेत. नाकात नथ आहे, कपाळावर टिकली आणि केस बांधलेले आहेत. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. अपूर्वा या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. Apoorva Nemalekar
Ratna Debnath: पनिहाटी मतदारसंघातही तृणमूलला मोठा झटका ; आरजीकर अत्याचार पीडितेची आई आघाडीवर
पोस्टरमध्ये अपूर्वाच्या मागे संपूर्ण अंधार दिसत असून पुढे एक कंदील पाहायला मिळत आहे. याबरोबरच, या पोस्टरवर “ती दिसते पण सगळ्यांना नाही,” असेही लिहिले आहे. यात अपूर्वा पद्मिनी हे पात्र साकारणार असल्याचेही समोर आले आहे. Apoorva Nemalekar
ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, “रात्र झाली की… ती येते, गाव तिला घाबरतं, पण ती कोणालाच घाबरत नाही; पद्मिनी, लवकरच”, असे लिहित तिच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. पोस्टर आणि अभिनेत्रीने दिलेल्या कॅप्शनवरून हा हॉरर प्रोजेक्ट असल्याचे दिसत आहे.. Apoorva Nemalekar
View this post on Instagram
या सीरिजबद्दल ती म्हणाली, “पद्मिनी एक ‘फोर्स’ आहे. जी विसरलेलं सत्य परत समोर आणते. न्याय विरुद्ध सूड, सामर्थ्य विरुद्ध असुरक्षितता असे विविध पदर या कथेला आहेत. मुळात ही एक सामाजिक भाष्य असलेली भयकथा आहे. या कथेत अनेक रहस्यमय, अनपेक्षित वळणं आहेत. प्रत्येक भागात नवं काहीतरी उलगडत जाईल. ही कथा सत्ता, अन्याय आणि सत्य यावर भाष्य करते.’ (Apoorva Nemalekar )
पद्मिनीचा लूक शेवंतासारखा दिसत असल्याच्या प्रतिक्रियांवर ती म्हणाली, मी त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहते. पण पद्मिनी पूर्णपणे वेगळी ओळख आहे. त्या दोघींच्या दिसण्यात साम्य असेल, पण व्यक्तिरेखा आणि त्यांचा प्रवास पूर्णपणे वेगळा असल्याचे तिने सांगितले. Apoorva Nemalekar
हेही वाचा :

