‘Apollo Hotfoot Trophy’ : ब्राका फुटबॉल अकादमीची आगेकूच…

पुणे :- हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सातव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेच्या ९ वर्षाखालील गटामध्ये ब्राका फुटबॉल अकादमी, फोर लायन्स् फुटबॉल अकादमी, फाल्कन्स् फुटबॉल अकादमी, सिग्मय फुटबॉल क्लब आणि साई फुटबॉल अकादमी या संघांनीविजयी कामगिरी केली.
या स्पर्धेत ९ वर्षाखालील गटाच्या सामन्यात ब्राका फुटबॉल अकादमीने स्पोर्टीक्यु फुटबॉल अकादमीचा ४-१ असा सहज पराभव केला. ब्राका संघाकडून कविश सिंग याने २ गोल तर, रोनिन डिसुझा आणि जिडेन फर्नांडिस यांनी प्रत्येकी एकेक गोल नोंदविले. सिद्धेश वीर आणि अविनाश देशपांडे यांच्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर फोर लायन्स् फुटबॉल अकादमी क संघाने लौकिक फुटबॉल अकादमीचा ४-१ असा पराभव केला. फाल्कन्स् फुटबॉल अकादमीने उत्कर्ष क्रिडा मंच संघाचा ४-२ असा पराभव केला.
फाल्कन्स्कडून निनाद सरदेशमुख आणि सत्येन घोगरे यांनी प्रत्येकी दोन गोल मारले. सिग्मय फुटबॉल क्लब आणि लौकिक फुटबॉल अकादमी ब यांच्यातील सामना टाय झाला. सिग्मयकडून विराज देशमुख आणि सविनाश पाटील यांनी तर, लौकिक फुटबॉल अकादमी ब संघाकडून अर्थ जोशी आणि नचिकेत जोशी यांनी गोल केले. साई फुटबॉल अकादमीने लौकिक फुटबॉल अकादमी अ संघाचा ४-२ असा सहज पराभव केला.
Senior National Championship Wrestling : पृथ्वीराज मोहोळ, सोनबा गोंगाणे यांना सुवर्णपदक…
साई संघाकडून कल्पेश जोशी याने २, विवान सिंग आणि अविआन मेहरा यांनी प्रत्येकी एक गोल केला. १५ वर्षाखालील गटाच्या सामन्यात फाल्कन्स् फुटबॉल अकादमीने सलग दोन विजय नोंदविण्याची कामगिरी केली. सार्थक शिंदे याने नोंदविलेल्या दोन गोलांमुळे फाल्कन्सने पहिल्या सामन्यात साई फुटबॉल अकादमीचा २-१ असा पराभव केला. दुसर्या सामन्यात फाल्कन्स् फुटबॉल अकादमीने फोर लायन्स् फुटबॉल अकादमी ब संघाचा २-० असा सहज पराभव केला. सार्थक शिंदे आणि आरूष कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला.

