‘अपरिचित’ फेम विक्रमने केली कपिल शर्माची बोलती बंद

मुंबई – ‘द कपिल शर्मा’च्या शोमध्ये अनेक मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात आणि यादरम्यान ते खूप मस्ती करताना दिसतात. या क्रमात पोन्नियन सेल्वन या चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या शोध्येही पोहोचणार आहे.या एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये पोन्नियिन सेल्वन स्टार्स जयराम रवी, अभिनेता विक्रम आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसत आहेत. दरवेळेप्रमाणेच यावेळीही कपिल शर्मा त्याच्या स्टाईलमध्ये विनोद करताना दिसला पण यावेळी अभिनेता विक्रमने त्याच्या उत्तराने कपिलची बोलती बंद केली.
शोमध्ये कपिल अनेक मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल नेहमीप्रमाणे आपला ठरलेला प्रश्न अभिनेता विक्रमला विचारतो की, जेव्हा तू ‘अपरिचित’ चित्रपटाचे शूटिंग करत होतास तेव्हा तुला वाटले होते की एक दिवस तुला द कपिल शर्मा शोमध्ये जाण्याची संधी मिळेल ? कपिलचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अभिनेता विक्रमने क्षणाचाही विलंब न लावता त्याला असे उत्तर दिले की त्याची बोलती बंद झाली आणि सगळे हसायला लागले. विक्रम कपिलला म्हणतो की हो, मला वाटलं नव्हतं मी या शोमध्ये येईल. पण मी आठवीला असताना. १९७६ साल होतं तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता ? तेव्हाच ठरवलेलं कपिल शर्माचा शो येणार आहे त्यात आपल्याला नक्की जायचंय. कपिल जन्मलेला नसतानाही विक्रमने हे ठरवल्याचे सांगून कपिलला टोला लगावला आहे.
View this post on Instagram
मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय देखील दिसणार आहे. मात्र, ती या शोच्या प्रोमोमध्ये दिसली नाही. PS1 येत्या 30 सप्टेंबर 2022 रोजी मोठ्या प्रमाणावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.





