केंद्रीय गृह मंत्रालयाचे काही अधिकारी सीबीआयच्या रडारवर
Updated On:

नवी दिल्ली – परकी देणग्या नियमन कायद्याच्या उल्लंघनावरून सीबीआयने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून तब्बल 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या कारवाईच्या रडारवर केंद्रीय गृह मंत्रालयाचे काही अधिकारी आणि काही बिगर सरकारी संस्थांचे (एनजीओ) प्रतिनिधी असल्याचे समजते.
परकी देणग्या मिळवताना संबंधित कायद्याच्या उल्लंघनाची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने व्यापक मोहीम सुरू केली. त्यानुसार, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोईम्बतूर, मैसूर आणि राजस्थानमधील काही ठिकाणी छापासत्र राबवण्यात आले. कारवाईवेळी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यामध्ये गृह मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय, 2 कोटी रूपयांचे हवाला व्यवहार उघडकीस आणण्यातही सीबीआयला यश आल्याची माहिती सुत्रांनी दिली.





